फटक्‍यांमुळे जखमी होणाऱ्या प्राणी-पक्षांच्या किती घट झालीये पाहा 

फटक्‍यांमुळे जखमी होणाऱ्या प्राणी-पक्षांच्या किती घट झालीये पाहा 

मुंबई : दिवाळीच्या काळात फट्‌क्‍यांच्या धुराचा आणि आवाजाचा त्रास जेवढा माणसा होतो त्यापेक्षा अधिक प्राणी व पक्ष्यांवर होत असतो. दिवाळी वाजवल्या जाणाऱ्या फटाक्‍यांमुळे अनेकदा परिसरात वावणारे प्राणी पक्षी जखमी होतता. परंतु मागील वर्षीपेक्षा प्राणी आणि पक्षी जखमी होणाच्या प्रमाणात 60 टक्के घट झाली आहे. 

समाज माध्यमातून दिवाळीच्या काळात मुक्‍या प्राणी-पक्ष्यांना कसे जपावे याची जनजागृती केली जात आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात प्राणी- पक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दसरा, दिवाळी काळात लहान प्राणी पक्षी परळ येथील बाई साखराबाई दिनशॉ पेटिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात.

फटक्‍यामुळे प्राण्यांवर मानसिक, शारिरीक, आरोग्य स्वास्थावर परिणाम होतो. धुरामुळे श्वसनाचा, डोळ्यामध्ये आग होणे असे त्रास प्रामुख्याने प्राणी व पक्ष्यामध्ये होतात. फटाक्‍यांच्या आवाजमुळे घरातील पाळीव प्राणी दिवाणाखाली किंवा घराच्या एका कोपऱ्या लपून बसतात. तर कधी दार उघडे राहिले तर प्राणी फटाक्‍यांचा आवाज कुठून येतो याचा अंदाज घेत बाहेर निघून जातात आणि हरवतात.

प्राण्याची संप्रेरके गरज नसताना भीतीने स्त्रवतात. यामुळे त्यांना सतत लघवी होणे, भूक कमी होणे असा परिणाम होतो, अशी माहिती बाई साखराबाई दिनशॉ पेटिट रुग्णालयाचे सचिव डॉ. जे.सी. खन्ना यांनी दिली.

फटाक्‍यामुळे हवा दूषित होते. हवेत सल्फर डाय ऑक्‍साइड, नायट्रोजनचे प्रमाण वाढते. हे घातक वायु श्वसनातून त्यांच्या शरिरात जातात. फटाक्‍यांमुळे प्राण्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो. त्यांना डोळे येण्यासारखा आजार होतो. प्राण्यांची त्वचा भाजते. कधी कधी झळून विझलेल्या फूलभाज्यांवर कुत्रे आणि मांजरींचा पाय पडतो आणि ते जखमी होतात. परंतु जनजागृतीमुळे गेल्या पाच वर्षाच दिवाळीमध्ये जखमी होणाऱ्या प्रमाण कमी होत आहे, असे डॉ. खन्ना यांनी सांगितले. या वर्षी रुग्णालयात दाखल झालेल्या कुत्रे व मांजरींनी डोळ्यांचे इन्फेक्‍शन झाले आहे. पक्षांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, असे डॉ. खन्ना म्हणाले. 
 

जखमी झालेल्या प्राणी पक्षांची संख्या | 2018 

  • कुत्रे 20 
  • मांजरी 10 ते 12 
  • पक्षी 100 

जखमी झालेल्या प्राणी पक्षांची संख्या | 2019 

  • कुत्रे - 11 
  • मांजर - 7 
  • कबुतरे 12 
  • घार - 4 ते 5 
  • लव्हबर्ड - 1


गेल्या वर्षापूर्वी दिवाळीच्या काळात जखमी होणाऱ्या पक्षी आणि प्राण्याचे प्रमाण 200 ते 300 होते. पण ते आता हळूहळू कमी होऊन या वर्षी ते प्रमाण 60 टक्कावर आले आहे. प्राणी व पक्षी प्रेमींच्या जनजागृतीमुळे हे प्रमाण कमी झाले. - डॉ. जे.सी. खन्ना 
 

Webtitle : sixty percent less birds and animal hurt during this diwali due to firecrackers and sound

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com