इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जागीच ठार

The slab of the building collapsed and the woman killed on the spot
The slab of the building collapsed and the woman killed on the spot

उल्हासनगर : आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडल्याने त्याखाली एका 47 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. पालिका-पोलीस-अग्निशमन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण इमारत खाली करण्यात येत आहे.

भाटिया चौका लगत मुरलीवाला कॉम्प्लेक्स ही चार मजल्याची इमारत असून त्यात 16 प्लॅटस व 4 दुकाने आहेत. साडेसहाच्या सुमारास या इमारतीतील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला. त्यात नेताजी चौकात शिवशक्ती ड्रायफ्रूट चे व्यापारी असलेले भरत गंगवानी यांची 47 वर्षीय पत्नी लिना गंगवानी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही घटना समजताच, स्थानिक नगरसेवक भारत गंगोत्री, नगरसेविका सुनिता बगाडे, सुमन सचदेव, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मुकादम श्यामसिंग, मयूर परब, राठोड, हिललाईन ठाण्याचे पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारत खाली करण्यास सुरुवात केली आहे. ही इमारत धोकादायकच्या यादीत नव्हती. पण संततधार पावसाने स्लॅब कोसळून निरागस महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नगरसेवक भारत गंगोत्री यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com