शयनयान रातराणी प्रवाशांसाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबई - एसटीची विनावातानुकूलित शयनयान रातराणी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. ही गाडी आता पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबई - एसटीची विनावातानुकूलित शयनयान रातराणी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. ही गाडी आता पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

राज्यातील बहुतांश मार्गांवर सध्या रातराणी सेवा सुरू आहे. या मार्गांवर टप्प्याटप्प्याने 600 रातराणींच्या जागी विनावातानुकूलित शयनयान बस चालवण्यात येणार आहेत. महामंडळाच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यशाळेत या शयनयान बसची बांधणी केली आली. प्रोटोटाइप म्हणून ही बस बांधण्यात आली आहे. "सीआयआरटी'ने हिरवा कंदील दिल्यानंतर अशा एक हजार बसची बांधणी करण्यात येईल. टू बाय वन अशा प्रकारची 30 आसनी व्यवस्था या बसमध्ये करण्यात आली आहे. रातराणीच्या आंतरराज्य मार्गावर प्रथम या नव्या बसगाड्या धावणार आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यंदा 20 जानेवारीला या बसची घोषणा केली होती.

प्रवासभाडे स्थिर
सध्या एसटीच्या रातराणी बसला जो तिकीट दर आहे, त्याच प्रवासभाड्यात विनावातानुकूलित शयनयान बस प्रवाशांना उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

Web Title: Sleeper coach Ratrani bus ready