मनसे घेराव घालता मल्टीलुट मध्ये किंचितशी सूट

mns.jpg
mns.jpg

उल्हासनगर : फनसिटी बिग सिनेमाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेराव घालताच  झालेल्या सकारात्मक चर्चेत सिनेमागृहात खाद्य-पेय वस्तूंवर केल्या जाणाऱ्या मल्टीलुट मध्ये किंचितशी अर्थात 20 रुपयांची सूट देण्यात आली आहे. चहा प्रती कप 40 रुपये आणि समोसा जोडी 50 रुपये अश्या स्वस्त दरात विकणार असल्याचे मान्य केले. हा दर गोरगरिबांना परवडणारा आहे काय? मनसेने या दराला मान्यता कशी दिली? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

बिग सिनेमागृहाच्या समोरच हाकेच्या अंतरावर असलेल्या फॉरवर्ड लाईनच्या चौकात चहा-समोसा प्रत्येकी 10 रुपयाला मिळत असताना सिनेमागृहात चहाच्या कपाला 70 रुपये समोशाच्या जोडीला देखील 70 रुपये आकारण्यात येत होते. याशिवाय पाण्याची बिसलेरी बॉटल 50 रुपये व अर्ध्या लिटरचा कोकाकोला 76 रुपयांना मिळत होता. फनसिटी बिग सिनेमा मध्ये नाळ ह्या बहुचर्चित मराठी चित्रपटाचे 4 खेळ लावण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी नागरिक तोबा गर्दी करत आहेत. हे पाहून सिनेमागृह मालकांनी प्रेक्षकांच्या खिश्यावर डल्ला मारायला सुरूवात केली होती.सहपरिवार नाळ चित्रपट बघण्यासाठी गेलेले गौतम वाघ यांना अर्ध्या मिलिलिटरचा कोका कोला 76 रुपयांना असा दुप्पट भावाने देण्यात आले. त्याबाबत वाघ यांनी जाब विचारल्यावर घ्यायचे तर घ्या, असा दम विक्रेत्यांनी भरला होता.
तसेच वाघ यांनी मुलांसाठी नेलेली गरम पाण्याची बाटली आणि फ्रुटी देखील सिनेमागृहात प्रवेश करतानाच द्वारपालाने काढून घेण्यात आली होती.

याबाबत मनसेने दर कमी केले नाही तर, आंदोलन छेडण्यात येणार असा इशारा दिला होता. मात्र तरीही दरा बाबत सिनेमागृह चालक निर्णय घेत नसल्याने जिल्हाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप गोडसे, उपजिल्हा सचिव संजय घुगे, शहराध्यक्ष बंडू देशमुख, संघटक मैनुद्दीन शेख, उपाध्यक्ष अॅड. अनिल जाधव, सचिन बेंडके, शैलेश पांडव, मुकेश सेठपलानी, अक्षय धोत्रे, योगीराज देशमुख, अनिल गोधळे, जयराज ससाणे, बादशाह शेख, सागर चौहाण आदींनी बिग सिनेमावर धडक देऊन मालकाला घेराव घातला. तेंव्हा झालेल्या चर्चेत प्रत्येकी 70 रुपयांना मिळणारा चहा - समोसा 50-50 रुपयांना, तसेच पॉपकॉर्न, बिसलेरीची बॉटलवर देखील 20 रुपये कमी घेण्यास बिग सिनेमा प्रशासन तयार झाले आहे. हे दर आणखीन 10 रुपयांना कमी घेण्याचा हट्ट मनसेचा असून त्याबाबत येत्या तीन चार दिवसात सिनेमा प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com