स्लो लोकल बनली फास्ट !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - कल्याण स्थानकातून बुधवारी सकाळी 9.51 वाजता सुटलेली धीमी लोकल मुलुंडनंतर थेट घाटकोपरला थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबई - कल्याण स्थानकातून बुधवारी सकाळी 9.51 वाजता सुटलेली धीमी लोकल मुलुंडनंतर थेट घाटकोपरला थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

ही लोकल मुलुंड स्थानकापर्यंत धीम्या मार्गावर सर्व थांबे घेत आली; मात्र मुलुंड स्थानक पार होताच थेट घाटकोपरला थांबल्याने नाहूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग स्थानकांत प्रवाशांना उतरताच आले नाही. लोकलने तब्बल चार थांबे न घेतल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. लोकल थांबणार नसल्याची कोणतीही उद्‌घोषणा स्थानक किंवा लोकलमध्ये करण्यात आली नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, मुलुंडपासून ती लोकल अर्धजलद चालवण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: slow local fast