मांडवा बंदरात का काढला जातोय गाळ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

अलिबाग, ता. २१ ः भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानची रो-रो प्रवासी वाहतूक पुढील महिन्यात सुरू होणार आहे; परंतु त्यानंतरही मांडवा बंदरातील गाळ काढण्याचे काम सुरूच असल्याने यामागील गौडबंगाल काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या कामासाठी दोन वर्षांत तब्बल २१ कोटी रुपये खर्च केले आहेत.  

अलिबाग : भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानची रो-रो प्रवासी वाहतूक पुढील महिन्यात सुरू होणार आहे; परंतु त्यानंतरही मांडवा बंदरातील गाळ काढण्याचे काम सुरूच असल्याने यामागील गौडबंगाल काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या कामासाठी दोन वर्षांत तब्बल २१ कोटी रुपये खर्च केले आहेत.  

मांडवा- भाऊचा धक्का रो-रो सेवा सुरू करण्यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्या तारखेपूर्वी गाळ काढण्याचे काम सुरू आहे.  गेल्या वर्षी मार्चमध्ये गाळ काढण्यासाठी ४ कोटी ५३ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली होती; परंतु रा-रो सेवेसाठी पूर्णतयारी झाली नसल्याने तो काढण्यात आला नाही. आता हे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत या कामासाठी २१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 

महापालिका इमारतींचे ‘फायर ऑडिट’ ... कोणत्‍या आहेत त्‍या इमारती ते वाचा

चाचण्यानंतरच उद्‌घाटन
रो-रो सेवेसाठी ‘प्रोटोपोरोस’ ही बोट गेल्या आठवड्यात ग्रीस येथून मुंबईत दाखल झाली आहे. तिच्या सीमा शुल्कासंबंधी कागदपत्रांची पूर्तता सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जलयान म्हणून तिची नोंदणी संबंधित यंत्रणेकडे करावी लागेल. त्यानंतर बोटीची चाचणी घेण्यात येईल. 

अबब... एवढा मोठा मासा जाळ्यात ... कोणता मासा ते वाचा सविस्तर

मांडवा बंदरात कातळाचा भाग आहे. या भागात बोट घासल्यास दुर्घटना होऊ शकते. त्याचबरोबर वाहने उतरविण्यासाठी ती बोट जेटीपर्यंत येणे आवश्‍यक आहे. यासाठी सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. 
- सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, मेरिटाईम बोर्ड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sludge is being removed from Mandva Port