तत्काळ उपचाराची रेल्वेकडे तोकडी यंत्रणा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - मुंबई लोकलमधून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी गर्दीतून प्रवास करतात. गर्दीमुळे अनेक प्रवाशांना दरवाजावर उभे राहून लटकून प्रवास करता लागतो. त्यामुळे दिवसाला 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून अपघात होतात. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याची कोणतीही सोय रेल्वेने केलेली नाही. रेल्वे रूळ व स्थानकांवर लोकलमधून पडणाऱ्या प्रवाशांना उचलण्यास रेल्वेने अधिकृतरीत्या कोणत्याही हमाल अथवा कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नसल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत समोर आले आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी प्रवाशांच्या उपचारासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत त्याची माहिती मागवली होती. रेल्वेचे माहिती अधिकारी नर्मेश्‍वर झा यांनी याबाबत माहिती दिली. उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाड्यांतून पडून जखमी झालेल्या किंवा मरण पावलेल्या प्रवाशांना उचलण्यासाठी कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केलेले नाहीत. अशाप्रसंगी संबंधित स्टेशन मास्तर, स्थानिक हमाल व स्वयंसेवक स्वेच्छेने मदत करतात, असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. 

जीवघेणा "लोकल'प्रवास 

उपनगरीय लोकल अपघात मृत्यू  - वर्ष 2017 

एकूण मृत्यू आणि जखमी  - 3,014, 3,345 

मध्य रेल्वे  - 1534, 1,435 

पश्‍चिम रेल्वे - 1086, 1540 

हार्बर लोकल  - 394, 370 

Web Title: Small immediate treatment to the railway system