तस्करी करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - मसाजच्या नावाखाली भुतानमधील तीन तरुणींना इराकला नेणाऱ्याला बुधवारी (ता. १३) सहार पोलिसांनी गजाआड केले. मोईदीन मोहम्मद फयाज असे त्याचे नाव असून तो श्रीलंकेचा रहिवासी आहे. त्याने भारतीय नावावर बनावट पारपत्र तयार केले होते. पोलिसांनी कारवाई करून तीन तरुणींची सुटका केली. त्या मुलींबाबत भुतानच्या दूतावासाशी पोलिसांनी संपर्क केला आहे. 

मोईदीन हा मूळचा कोलंबोचा रहिवासी आहे. बुधवारी चार जण सहार विमानतळावर आले होते. मोईदीनने विमानतळावर प्रक्रिया पार करून तो बाहेर पडला. तेव्हा सोबत असलेल्या तीन तरुणींच्या पारपत्राबाबत विमानतळ अधिकाऱ्यांना संशय आला. विमानतळ अधिकाऱ्यांनी त्या तिघींची चौकशी केली. त्यांच्या चौकशीनंतर मोईदीनला विमानतळ परिसरातून ताब्यात घेतले. त्या चौघांना सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. भुतानमधील फरारी महिला आरोपीच्या मदतीने त्या तरुणींचे पारपत्र बनवल्याची कबुली मोईदीनने पोलिसांना दिली. सहार पोलिसांनी मोईदीनविरोधात तस्करीच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याला गुरुवारी (ता.१४) न्यायालयात हजर केले होते. त्याला पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. मोईदीन हा एजंटचे काम करतो. तो बनावट पारपत्रावर कोलंबोमार्गे इराकला जाणार होता. त्याला तस्करीच्या मोबदल्यात काही रक्कम मिळणार होती. त्याने यापूर्वी काही महिलांना नोकरीकरता आखाती देशांत पाठवले होते का, याचा तपास सहार पोलिस करत आहेत.

Web Title: smuggler arrested crime