"एसएनडीटी'च्या वॉर्डनवर आरोप 

"एसएनडीटी'च्या वॉर्डनवर आरोप 

मुंबई - जुहू येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या कॅम्पसमधील वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वॉर्डनवर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला आहे. 400 विद्यार्थिनींनी कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, विद्यार्थिनींनी तक्रार दिली आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

फोर्ट येथील झेव्हिअर्स महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थिनीने माजी विद्यार्थ्यावर लैगिंग शोषणाचा आरोप केला होता. याबाबत महाविद्यालयाकडे तक्रारही केली होती; मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती, असा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे. आता एसएनडीटी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील वॉर्डनविरोधात तक्रार करण्यात आली आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडल्यानंतर 400 विद्यार्थिनींनी वसतिगृहाबाहेर निदर्शने सुरू केली. दरम्यान पोलिसही विद्यापीठात पोहचले. विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीनुसार चौकशी सुरू झाली आहे. ती पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com