रेल्वे कर्मचाऱ्यांचे हाल, मंगळवारी मध्य रेल्वे मार्गावरील कर्मचारी स्पेशल लोकल रद्द

रेल्वे कर्मचाऱ्यांचे हाल, मंगळवारी मध्य रेल्वे मार्गावरील कर्मचारी स्पेशल लोकल रद्द

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील परेल, माटुंगा हे दोन वर्कशॉप उघडण्यात आले होते. त्यामध्ये 33 टक्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले होते. त्यासाठी बुधवार (ता.20) पासून कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल लोकल सोडण्यात आली होती. मात्र मंगळवारी (ता.25) रोजी सकाळच्या कर्मचारी लोकल रद्द करून मेल, एक्सप्रेसचे जनरल चे डबे सोडण्यात आहे. त्यामध्येही कर्मचाऱ्यांनी दाटीवाटीने प्रवास केल्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याने रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यांची सुरक्षा करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ही सारखीच परिस्थिती आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली. मात्र कर्मचाऱ्याच्या विशेष लोकलमधील गर्दी आणि दाटीवाटीच्या प्रवासाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये फिजिकल डिस्टिन्सिंग नियमाचे उल्लंघन झाले. या व्हायरल व्हिडिओचा धसका घेत मध्य रेल्वे प्रशासनाने वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या फक्त 7 टक्के केली आहे. तर मंगळवारी सकाळी धावणाऱ्या लोकल रद्द करून मेल, एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागला आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना कोंबल्या सारखा प्रवास दिसून आला. 

पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर बोलावल्या जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन हतबल दिसून येत आहे. मेल, एक्स्प्रेसचे जनरल डब्यांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागत असल्याने सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडतांना दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता दिसून येत आहे. 

कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती महत्वाची

रेल्वेच्या श्रमिक ट्रेन, राजधानी स्पेशल, अशा विविधे सेवा रेल्वेच्या हळूहळू सुरू केल्या जाणार आहे. त्यासाठी रेल्वेला कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणारच आहे. मात्र, कर्मचार्यांकडूनच सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात नसल्याने सोशल डिस्टनसिंगचा प्रश्न उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.

social distancing goes for a toss when special train for train workers is cancelled

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com