सामाजिक स्टार्टअपसाठी आयआयटी मुंबईतर्फे स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

देशातील सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्याकरिता, नागरिकांकडे असलेल्या संकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या अभ्युदय मंचाने ‘ॲक्‍शन प्लॅन’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातील महाविद्यालयीन तरुणांना सहभागी होता येणार आहे.देशातील सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्याकरिता, नागरिकांकडे असलेल्या संकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या अभ्युदय मंचाने ‘ॲक्‍शन प्लॅन’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातील महाविद्यालयीन तरुणांना सहभागी होता येणार आहे.

मुंबई: देशातील सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्याकरिता, नागरिकांकडे असलेल्या संकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या अभ्युदय मंचाने ‘ॲक्‍शन प्लॅन’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातील महाविद्यालयीन तरुणांना सहभागी होता येणार आहे.

‘ॲक्‍शन प्लॅन’ या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, शिक्षण, बेरोजगारी, दारिद्य्र, शाश्‍वत ऊर्जा, महिला सक्षमीकरण, कृषी आणि पशुपालन या क्षेत्रातील समस्यांवरील तोडगा काढणाऱ्या संकल्पना सादर करायच्या आहेत. सहभागी विद्यार्थ्यांच्या संकल्पनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन मिळणार आहे.

अनेकदा आर्थिक पाठबळाअभावी विद्यार्थ्यांना त्यांच्या संकल्पना राबवताना अडचणी येतात. त्यामुळे स्पर्धेतील निवडक स्पर्धकांच्या संकल्पनांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याशिवाय परिक्षण मंडळातील तज्ज्ञांसोबत काम करण्याची संधी आणि एक लाख रुपयांपर्यंतचे रोख पारितोषिक मिळणार आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या, http://abhyudayiitb.org/actionplan/.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SOCIAL STARTUP competition for IIT mumbai