युतीतील 'सोशल वॉर' रंगणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाची शिवसेना आणि भाजपमधील चर्चा होवो अथवा राहो; मात्र या दोन्ही पक्षांतील "सोशल मीडिया वॉर' भलतेच रंगणार असल्याचे मानले जाते. महापालिकेची सत्ता भाजपला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडून हिसकावून घ्यायची आहे. त्यामुळे शिवसेनेला नामोहरम करण्याची एकही संधी भाजप सोडणार नाही.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे याचे भांडवल करून भाजप सोशल मीडिया, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे, तर नोटाबंदी, त्यानंतर सर्वसामान्यांचे झालेले हाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका करण्याची संधी शिवसेना सोडणार नाही, अशी शक्‍यता आहे. या दोन्ही पक्षांनी आपापले आयटी सेल अद्यावत केले आहेत. भाजपकडून महापालिकेतील प्रशासन, त्यातील भ्रष्टाचार याबाबतच्या जाहिराती, ओळी, व्यंग्यचित्रे तयार करण्याचे सध्या काम जोरात सुरू असल्याचे समजते. भाजपच्या या अस्त्रांचा सामना करण्यासाठी शिवसेनेनेही पद्धतशीर रसद गोळा केल्याचे सांगितले जाते.

Web Title: social war increase in alliance