सोहेल कासकर लवकरच ताब्यात

sohail-kaskar
sohail-kaskar

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा पुतण्या सोहेल कासकर याला अमेरिकेतून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा ताबा मिळवण्यासाठी लवकरच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अमेरिकेला जाणार आहे.  

शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी अमेरिकेने काही दिवसांपूर्वी सोहेल कासकर, दानिश अली आणि दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी भारताने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिशचा ताबा पोलिसांना मिळाला; मात्र सोहेलचा ताबा मिळणे कठीण होते. बनावट पाकिस्तानी पारपत्र बनवल्याने त्याच्या प्रत्यार्पणात अडचणी येत होत्या. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती दिल्यानंतर सोहेलचा ताबा देण्यास अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी हिरवा कंदील दाखवला.  दानिश आणि सोहेल यांच्या अटकेनंतर दाऊदच्या अनेक कारवाया उघडकीस आल्या. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका असल्याचे बोलले जात आहे. म्हणून पोलिसांनी दानिशच्या अटकेबाबत गुप्तता पाळली. त्याचप्रमाणे सोहेल कासकरच्या अटकेबाबतही गुप्तता बाळगली जात आहे.

खंडणीच्या गुन्ह्यात होणार अटक
ज्याप्रमाणे दानिश अलीला अटक झाली, त्या खंडणीच्या गुन्ह्यातच सोहेल कासकरला अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींवर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सोहेलवरही हाच गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com