सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय  न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांची बनावट चकमकीत गुजरात पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे. सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापतीची देखील काही दिवसानंतर हत्या झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण मुंबई विशेष न्यायालयाकडे वर्ग झाले होते. तेव्हापासून या तिन्ही हत्या प्रकरणाची एकत्रित सुनावणी सुरू होती. 

सरकारी आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद 6 डिसेंबर रोजी पूर्ण झाला असल्याने विशेष न्यायालयाने याप्रकरणी निर्णय राखून ठेवला. एकूण 22 आरोपींवरील युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. सीबीआयने याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह एकूण 32 जणांविरुध्द आरोप निश्चित केले होते. नंतर 16 जणांना दोषमुक्त केले. यात 14 पोलिस अधिकारी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा समावेश आहे. 700 साक्षीदारापैकी 210साक्षीदारांची प्रत्यक्ष साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. तर 92 साक्षीदार फितूर झाले.

या घटनेनंतर 5 वर्षांनी सीबीआयने तपासाची सुत्रे हातात घेतली तर 12वर्षांनंतर पहिल्या साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. 
सीबीआयच्या मते सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी हैदराबादहून महाराष्ट्रातील सांगली येथे जात असताना गुजरात पोलिसांनी त्यांचे अपहरण केले होते. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून नोव्हेंबर 2005 मध्ये गुजरात येथील गांधीनगर परिसरात ही चकमक घडविण्यात आली होती. या घटनेचा एकमेव साक्षीदार तुलसीराम प्रजापतीची हत्या डिसेंबर 2006 मध्ये गुजरात मधील बनासकांठा जिल्हातील चपरी गावात झाली होती. त्यावेळी अमित शहा गुजरातचे गृह राज्यमंत्री होते. या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

गुजरातचे गृहमंत्री हरेन पांड्या यांची हत्या सोहराबुद्दीन शेखने केली होती. 2003 मध्ये झालेल्या पांड्या यांच्या हत्येचे आदेश माजी आयपीएस अधिकारी डीजी वंजारा यांनी शेखला दिले होते अशी साक्ष या प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदाराने 4 नोव्हेंबरला विशेष सीबीआय न्यायालयात दिली
 
Web Title: Soharabuddin shaikh Will the results take place on December 21