पोलिसांना दोषमुक्त केल्याविरोधात याचिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी तीन पोलिसांना दोषमुक्त केल्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन यांनी ही याचिका केली आहे.

मुंबई - सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी तीन पोलिसांना दोषमुक्त केल्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन यांनी ही याचिका केली आहे.

न्यायालयात याविषयी विविध याचिका दाखल असून, त्यावर चार जुलैला एकत्रित सुनावणी घेण्यात येईल, असे न्या. ए. एम. बदर यांनी स्पष्ट केले. रुबाबुद्दीन शेख याच्या तीन, तर दोन सीबीआय अधिकाऱ्यांच्या याचिका आहेत. याचिकाकर्ता रुबाबुद्दीन आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे वकील यांनी एकत्रितपणे न्यायालयाला सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

फेब्रुवारीमध्ये न्यायमूर्तींसमोरील याचिकांत अचानक बदल केल्याने या याचिका विविध न्यायाधीशांसमोर सुनावणीला गेल्या होत्या. न्या. रेवती ढेरे-मोहिते या याचिकांवर वेगवेगळ्या दिवशी सुनावण्या घेत होत्या.

आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा, दिनेश एम. एन. आणि राजकुमार पंडियन या अधिकाऱ्यांना दोषमुक्त केल्याबद्दल रुबाबुद्दीन याने उच्च न्यायालयात याचिका केली आहे; तर गुजरातचे आयपीएस अधिकारी एन. के. अईम आणि राजस्थानचे पोलिस हवालदार दलपतसिंग राठोड यांना दोषमुक्त केल्याबद्दल सीबीआयने याचिका केली आहे.

Web Title: sohrabuddin shaikh high court police petition