सोलापूर-इंदूर विशेष गाडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - नियमित गाड्यांवरील अतिरिक्त भार कमी व्हावा यासाठी मध्य रेल्वेने सोलापूर ते इंदूरदरम्यान एकेरी मार्गावर विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 02099 सोलापूर-इंदूर विशेष गाडी 21 जूनला सायंकाळी पाच वाजता सोलापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता इंदूरला पोचेल. कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम, नागदा आणि उज्जैन स्थानकांत या गाडीला थांबा आहे. या गाडीचे आरक्षण 17 जूनपासून सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
Web Title: solapur indur special railway