पोलिसांना ‘सोलर ब्लिंकर्स’ची भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पोलिस, पत्रकार आणि माणगावकर सारेजण मिळून एकत्रित प्रयत्नातून माणगावची वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी यापुढेही काम करुयात, अशी बोलकी प्रतिक्रिया माणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांनी व्यक्त केली आहे. 

माणगाव (वार्ताहर) : पोलिस, पत्रकार आणि माणगावकर सारेजण मिळून एकत्रित प्रयत्नातून माणगावची वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी यापुढेही काम करुयात, अशी बोलकी प्रतिक्रिया माणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांनी व्यक्त केली आहे. 

माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंगवले यांच्या प्रयत्नाने महिंद्राचे सीआयई ऑटोमोटिव्ह लि. साले गाव या कंपनीचे ईएसओपी फंडातून व्यवस्थापक सचिन राशिनकर व किशोर वेदपाठक यांच्या सौजन्यातून माणगाव शहरातील मुख्य महामार्गावर वाहतूक नियमनासाठी शनिवारी (ता. ७) सोलर ब्लिंकर्स देण्यात आले.

अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्य बाजारपेठेतील महामार्गावर केसरी रंगाचे सोलार ब्लिंकर्स बसवण्यात येणार आहे. माणगाव निजामपूर रोड जंक्‍शन, कचेरी रोड जंक्‍शन आणि माणगाव मोर्बा रोड जंक्‍शन येथील बाजारपेठेतील मुख्य महामार्ग अशा एकूण सहा ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. सोलर ब्लिंकर पोल माणगाव पोलिस ठाण्यास उपविभागीय पोलिस अधिकारी काशिद साहेब यांच्या उपस्थितीत देण्यात आले. 

गणेशोत्सवात दिवसरात्र पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. माणगावकरांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, भाविकांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी वाहतूक पोलिस प्रयत्न करतात. त्याबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solar blinkers gifted to police