नव्या वर्षात राज्याला मिळणार महाधिवक्ता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई - राज्याच्या पूर्णवेळ महाधिवक्तापदावर 30 डिसेंबरपर्यंत नियुक्ती करण्याची हमी शुक्रवारी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. महाधिवक्तापदावर नियुक्ती करणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक असूनही, सात महिन्यांहून अधिक काळ पूर्णवेळ महाधिवक्तापद राज्य सरकारने रिक्त ठेवले आहे. याविषयी कॉंग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे राज्याचे प्रभारी महाधिवक्ता रोहित देव यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली. शुक्रवारपर्यंत (ता. 30) सरकार पूर्ण वेळ महाधिवक्तापदाची नियुक्ती करणार आहे, असे देव यांनी स्पष्ट केले. श्रीहरी अणे यांच्यानंतर पूर्ण वेळ महाधिवक्तापद रिक्त आहे.
Web Title: Solicitor General of the State of the new year