सोमय्या यांना शिवसेनेच्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

विक्रोळी - ‘किरीट सोमय्या गेट वेल सून’ असे म्हणत ‘लगे रहो मुन्नाभाई’च्या स्टाईलने मुलुंडमध्ये शिवसैनिकांनी सोमय्या यांना डिवचले. सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने शिवसैनिकांनी काढलेल्या पदयात्रेत सोमय्या यांना लक्ष्य करण्यात येत आहे. 

मुलुंड जिमखान्यापासून शिवसेनेचे पदाधिकारी सौरभ साळवी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. १४) पदयात्रेला सुरुवात झाली. मुलुंड पूर्व विभागात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी ‘किरीट सोमय्या लवकर बरे व्हा’, ‘गेट वेल सून किरीट सोमय्या’ अशा घोषणा दिल्या आणि नागरिकांना फुलांचे वाटप केले.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्त सर्वच आजारी लोकांना आम्ही लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत आहोत. आमचे खासदार सोमय्याही आजारी आहेत. ते लवकर बरे व्हावेत आणि त्यांनी विभागात कामे करावीत, यासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. तसेच सोमय्या यांना फुले पाठवून लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा देण्याचे नागरिकांना आवाहन करत असल्याचे सौरभ साळवी यांनी सांगितले.

Web Title: Somaiya Shiv Sena's wishes