मुंबई माफियामुक्‍त करणार : सोमय्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुबई : भाजपचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना सोमया यांनी मुंबईला माफियामुक्‍त करणार, असे म्हटले आहे. 

मुबई : भाजपचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना सोमया यांनी मुंबईला माफियामुक्‍त करणार, असे म्हटले आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे. तसेच जागावाटपांच्या बोलाचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेवर टीकेचा भडिमार करण्याची एकही संधी खासदार सोमय्या यांनी सोडली नाही. ते म्हणाले, की मुंबई खड्डेमुक्‍त करणार म्हणजे करणारच, तसेच मुंबईला माफियापासून मुक्‍त करणार म्हणजे करणारच. शिवाय युती होईल अथवा राहील, आम्ही लढणार म्हणजे लढणारच. मागील काही महिन्यांपासून शिवसेनेच्या मुंबई महापालिका कारभाराची लक्‍तरे सोमय्या यांनी वेशीवर टांगली आहेत. तसेच महापालिकेच्या भ्रष्टाचाराची पाळीमुळे थेट बांद्य्राच्या साहेबांपर्यंत पोचली आहेत, अशी टीका करीत शिवसेनेस नामोहरम करण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत शिवसेनेबरोबर युती व्हावी, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याचे मानले जाते. कारण मुंबई महापालिकेत युती झाली तर राज्य सरकारला स्थैर्य लाभेल, असे फडणवीस यांना वाटते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: somayya for mafia free mumbai