मुंबईतील काही भागांत दोन दिवस पाणी नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

सांताक्रुझ येथील 2400 मि.मी. व्‍यासाच्‍या अप्‍पर वैतरणा जलवाहिनी दुरुस्‍तीचं काम करण्यात येणार आहे. यामुळे 13 ते 14 सप्‍टेंबरला एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागांत 30 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने या विभागात पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे.

मुंबई : सांताक्रुझ येथील 2400 मि.मी. व्‍यासाच्‍या अप्‍पर वैतरणा जलवाहिनी दुरुस्‍तीचं काम करण्यात येणार आहे. यामुळे 13 ते 14 सप्‍टेंबरला एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागांत 30 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने या विभागात पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे.

मुंबई पालिकेतर्फे टिचर कॉलनी, सांताक्रुझ येथील 2400 मि.मी. व्‍यासाच्‍या अप्‍पर वैतरणा जलवाहिनीच्‍या दुरुस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले आहे. सदर काम हे शुक्रवारी 13 सप्‍टेंबरला सकाळी 10 वाजल्‍यापासून शनिवार 14 सप्टेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण 30 तासांसाठी हाती घेण्‍यात येणार आहे. यास्‍तव, पुढे नमूद केलेल्‍या विभागांमध्‍ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.  

विभाग     प्रभावित परिसर 

एच/पूर्व     वांद्रे टर्मिनस परिसर 

जी/उत्तर     धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा शुक्रवार, दिनांक 13 सप्‍टेंबर, 2019 रोजी धारावी मेन रोड, गणेश मंदीर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड व दिलि‍प कदम मार्ग. 

जी/उत्तर    धारावी सकाळचा पाणीपुरवठा शनिवार, दिनांक 14 सप्‍टेंबर 2019 रोजी प्रेम नगर, नाईक नगर, 60’ रोड, जस्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्‍प, 90’ रोड, एम. जी. रोड, धारावी लुप रोड. 

जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पालिकेने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्‍हणून पाण्‍याचा पुरेसा साठा करण्याचे व पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In some parts of Mumbai there is no water for two days