धक्कादायक! कुटुंबावर दुःखाचा डोंगर; अवघ्या एका आठवड्यात पिता-पुत्राचा कोरोनामुळे मृत्यू...

corona death
corona death

मालाड : मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून गुरुवारी 1554 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 80262 झाली आहे. तर 57 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4,686 वर पोचला आहे. मात्र कोरोनाच्या या संकटामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशीच एक दुःखद घटना मालाड परिसरात घडली. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील पिता-पुत्राचा मृत्यू झआल्याची घटना मालाड परिसरात घडली आहे.

मालाड येथील रहिवासी असलेल्या एका 86 वर्षीय वृद्धाला ताप आल्याने 22 जून रोजी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही चाचणी करण्यात आली. त्यांनी रुग्णालयात घेऊन आलेल्या त्यांच्या 49 वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पिता-पुत्र दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना अॅडमीट करण्याचा सल्ला दिला.

मात्र, आर्थिक खासगी रुग्णालयातील खर्च पाहता ते परवडणारे नसल्याने आणि ते दोघेही रेल्वे कर्मचारी असल्याने दोघांनाही मुंबई सेंट्रल येथील रेल्वेच्या बाबू जगजीवनराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान 26 जून रोजी वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुबाला मोठा धक्का बसला. यातून सावरत नाही तोच 1 जुलै रोजी मुलाचाही मृत्यू झाला. मुलाला दम्याचा त्रास असल्याचेही समजते. अवघ्या एका आठवड्यात एकाच कुटुंबातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com