अय्याशीसाठी पैसे देत नाहीस काय, थांब तुला ना...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

'पैसे देत नाही' या रागाने मुलानेच केले जन्मदात्या आईच्या देहाचे तीन तुकडे. महिलेची हत्या करणाऱ्या नराधमाचा घाटकोपर पोलिसांनी 10 दिवसांत लावला सुगावा 

मुंबई : घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 9:30 च्या सुमारास शीर आणि पाय नसलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. या हत्येचे गूढ उकळले असून हत्या करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तो त्या महिलेचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहंमद सोहेल शफी शेख याने आईच्या नात्याला काळिमा फासली आहे. सोहेल शेख आणि त्याच्या आईचे रोज काहीना काही शुल्लक कारणावरून भांडण होत असत . सोहेल नोकरी धंदा करत नसल्याने तो बेरोजगार होता. उनाडक्या मज्जा मस्ती करण्यातच त्याचा दिवस जायचा. दिवस मजा मस्तीसाठी तो रोज आईकडे पैशांची मागणी करायचा.

मोठी बातमी : सावधान... केवायसीमुळे व्हाल कंगाल 

सोहेलच्या या रोजच्या पैशांच्या मागणीमुळे दोघात भांडण होत असत. अशाच किरकोळ पैशांच्या भांडणातून आईने पैसे दयायला नकार दिल्याने सोहेलने आईचा गळा दाबून देह घराच्या बाथरूम मध्ये कोंडून ठेवला त्यानंतर कुणाला त्याचा सुगावा लागू नये म्हणून त्याने शीर, पाय आणि धड वेगवेगळे करत चादरी मध्ये गुंडाळून विद्याविहार नौसेना विहार रस्त्यावर एका नाल्यालगत फेकून दिले. या बातमीने परिसरात खळबळ होताच क्रूरपणे केलेल्या गुन्ह्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

आई पैसे देत नाही याचा राग आल्याने जन्मदात्या आईलाच शुल्लक कारणावरून तिची गळा दाबून हत्या करत देहाचे तीन तुकडे करून रस्त्यावर फेकून देणाऱ्या नराधम मुलाला घाटकोपर पोलिसांनी कुर्ला येथील राहत्या घरातून अटक केली आहे. मोहंमद सोहेल शफी शेख (33) असे अटक आरोपी मुलाचे नाव असून बदृनिसा शेख (48 ) असे मृत महिलेचे नाव आहे .

Image may contain: 13 people, people standing and indoor

Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात..

या संदर्भात घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांनी तपास सुरू केला पोलिसांनी विविध शहरातील हरवलेल्या महिलांची माहिती संकलन करून शोध घेण्यात सुरुवात केली असता काही गुप्त माहितीदारा द्वारे महिलेचे पाय आणि शीर याचा तपास केला. मिळालेले महिलेचे शीर, धड आणि पाय हे त्याचेच आईचे असल्याचे अटक आरोपीने पोलिसांसमोर स्पष्ट केले.

मोठी बातमी : पेट्रोल पंपावरच करायचे 'तसले' धंदे, CCTV मध्ये झालं रेकॉर्ड..

याबाबत पोलिस आरोपीचे वैद्यकीय आणि सर्व शास्त्रीय पुरावे हस्तगत करत आहेत . घाटकोपर पोलीस ठाण्यात गु.नो.क्र 898 / 2019 कलम 302 , 201 भा.द.वि.स अन्वये गुन्हा नोंद केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

son killed his mother for not giving money mumbai solved case in 10 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son killed his mother for not giving money mumbai solved case in 10 days