अभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सोनाली बेंद्रे कर्करोगावर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण केल्यानंतर आता सोनाली मायदेशी परतली आहे. सोनालीने मायदेशात येणार असल्याचे नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात परतली असून, तिच्या चेहऱ्यावर हसू होते. यावेळी तिचा पती गोल्डी बहेल उपस्थित होते. 

सोनाली बेंद्रे कर्करोगावर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण केल्यानंतर आता सोनाली मायदेशी परतली आहे. सोनालीने मायदेशात येणार असल्याचे नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 

सोनाली कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिने पुढील उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये गेली होती. न्यूयॉर्कमध्ये उपचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, काही दिवसांनंतर ती पुन्हा न्यूयॉर्कला परतणार आहे. तिथेच माझे मन आहे. मला यामुळे अत्यंत आनंद होत आहे. हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मात्र, मी प्रयत्न करत आहे, की माझे कुटुंबिय आणि मित्रांना परत पाहणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायक आहे. ही बाब मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. जे मला आवडते ते मी करेन, असेही तिने सांगितले होते.

Web Title: Sonali Bendre returns to india after taking treatment of cancer in New York