सोनम कपूरला लंडनमध्ये का वाटली भीती ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

त्या अनुभवाबद्दल सोनम कपूरने ट्वीट करून दिली माहिती

मुंबई - सोनम कपूर कायम लंडनमध्ये ये जा करत असते. सोनमचं लग्न आनंद अहुजासोबत झालंय. त्यांचं लंडनमध्ये घर असल्याने सोनम सध्या अनेकदा लंडनमध्ये असते. अशातच नुकतीच सोनम कपूर लंडनमध्ये असताना तिला एक धक्कादायक अनुभवाला समोरं जावं लागलं  

मोठी बातमी - काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का ? सोनिया गांधी उत्तर द्या..

काल सोनम कपूर (Sonam Kapor) लंडनमध्ये असताताना तिने उबर (UBER) टॅक्सी बुक केली. तिने बुक केलेल्या टॅक्सीच्या ड्रॉयव्हरचं वर्तन खूपच भीतीदायक असल्याचं तिने सांगितलंय. टॅक्सीमधून प्रवास करताना  ड्रायव्हरच्या वर्तनाने सोनम घाबरली, टॅक्सी ड्रायवरची मानसिक स्थिति ठीक नव्हती, तो ओरडत होता, चिडत होता आणि त्याच्या या वागण्यामुळे मला धक्का पोहोचल्याचं तिने सांगितलंय. यानंतर कुणीही 'उबर'सारखी सेवा घेण्याऐवजी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा असा सल्ला देखील सोनमने सर्वांना दिला आहे. 

मोठी बातमी -  रायगडच्या 'या' तालुक्यातील लोकं घरं सोडून पळतायेत!
 

या आधीही सोनमला आला होता वाईट अनुभव:

या आधी देखील सोनम कपूरने ब्रिटिश एअरवेजच्या विरोधात ट्वीट केलं होतं.  ब्रिटिश एअरवेजच्या चुकीने तब्बल दोनदा सोनम कपूरचं सामान गहाळ झालं होतं. त्यावर सोनमने 'मी आता ब्रिटिश एअरवेजने कधीही प्रवास करणार नाही', असं ट्वीट केलं होतं. या प्रकारावर ब्रिटिश एअरवेजने सोनमची माफी देखील मागितली होती.

मोठी बातमी - फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांना अटक होणार का ?

मात्र अद्याप 'उबर'कडून या संपूर्ण प्रकरावर कुठल्याही प्रकारची माफी मागण्यात आलेली नाही. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे सोनम चांगलीच धास्तावलेली दिसतेय. 

sonam kapoor encountered scary moment during her uber ride in london      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonam kapoor shared her scary moment during her uber ride in london