सोनू जालानच्या चौकशीतून बॉलीवूडचा सहभाग उघड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सट्टा खेळणाऱ्या सोनू जालानच्या चौकशीतून धक्‍कादायक माहितीचा उलगडा होऊ लागला आहे.

ठाणे : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सट्टा खेळणाऱ्या सोनू जालानच्या चौकशीतून धक्‍कादायक माहितीचा उलगडा होऊ लागला आहे. अभिनेता अरबाझ खानपाठोपाठ बॉलीवूडमधील आणखी सहा जण सट्टेबाजीत गुंतल्याचे समोर आले आहे. यात चित्रपट निर्माता आणि अभिनेत्यांचा समावेश आहे. सट्टेबाजीतील बॉलीवूड कनेक्‍शन किती मोठे आहे, याचा लवकरच उलगडा होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

आयपीएलमध्ये सट्टा खेळणाऱ्या सट्टेबाजांना काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यात देशातील बडा सट्टेबाज सोनू जालानचा समावेश आहे. त्याच्या अटकेनंतर अरबाझ खानचे नाव पुढे आले होते. अरबाझला ठाणे पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर आता बॉलीवूडमधील आणखी सहा जणांचा सहभाग उघडकीस आला आहे. पुढील काही दिवसांमधील आणखी कलाकारांची नावे पुढे येण्याची शक्‍यता तपासकर्त्यांनी वर्तवली आहे. 

Web Title: Sonu Jalan's investigation revealed Bollywood's involvement