शपथपत्रात उत्पन्नाचा स्रोत बंधनकारक - सहारिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या शपथपत्रात आता उमेदवारांना स्वत:च्या व त्याच्यावर अवलंबित असलेल्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आणि उत्पन्नाचे व विविध करारांचे तपशील; तसेच यापूर्वी निवडणूक लढविली असल्यास त्याबाबतची माहिती नमूद करावी लागेल, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी दिलेल्या निर्देशानुसार शपथपत्रात आता नवे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवाराला उत्पनाचा स्रोत आणि मागील तीन वर्षांचे तपशील सादर करावे लागतील. 

‘पुढील निवडणुकांपासून बदल लागू’
उमेदवाराने यापूर्वी निवडणूक लढविली असल्यास, त्या वेळी सादर केलेल्या माहितीचा गोषवारादेखील शपथपत्रात नमूद करणे आवश्‍यक राहील. त्यात यापूर्वी लढविलेल्या निवडणुकीचे नाव, वर्ष, त्या वेळी जाहीर केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचे मूल्य, दायित्वे/थकीत रकमांचा गोषवारा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. आता यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये हा बदल लागू होईल, अशीही माहिती सहारिया यांनी दिली.

Web Title: source of income in the affidavit is binding