अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' भागात वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' भागात वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढताना दिसतोय. तसंच दररोज कोरोनाबाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. मुंबई शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मुंबईतील कोरोना नियंत्रणात येत असताना आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. मशीद बंदर, डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत मुंबईत सर्वात कमी रुग्णसंख्या असलेला भाग म्हणून हे परिसर प्रसिद्ध होते.

बी विभाग असलेल्या मुंबईतील मशीद बंदर, डोंगरी, उमरखा़डी या भागात सर्वात कमी रुग्णसंख्या होती. गेल्या काही दिवसांपासून या भागात दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. संपूर्ण मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.८७ टक्के आहे. तर या भागातील रुग्णवाढीचा दर अचानक १.२ टक्के झाला आहे. त्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे. मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर आहे. तर बी विभागातील हाच कालावधी ५७ दिवसांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे, जुलै महिन्यात या भागाचा रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांवर होता. 

सध्या या विभागात ११०४ रुग्ण आहेत. मुंबईतील सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्ण या भागात आढळून आली आहेत. या भागात ७९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 
या विभागात मुळातच रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे थोड्या संख्येनं रुग्ण वाढले तरी रुग्णवाढीचा दर वाढलेला दिसतो, असं मत बी विभागाचे साहाय्यक आयुक्त नितीन आर्ते यांनी व्यक्त केले. 

तसंच गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्यानं रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र आम्ही खबरदारी घेत आहोत. रुग्णांच्या संपर्काचा शोध घेणे, पाठपुरावा करणे आदी उपायांमुळे इथे रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचंही आर्ते यांनी सांगितलं.

बी विभागातील रुग्णसंख्या

तारीख एका दिवसातले रुग्ण
   
१४ जुलै
१५ जुलै
१६ जुलै १२
१७ जुलै
१८ जुलै
१९ जुलै 
२० जुलै 
एकूण   ९०९

रुग्ण दुपटीचा कालावधी -१०० दिवस

तारीख एका दिवसातले रुग्ण
   
३ ऑगस्ट १६
४ ऑगस्ट १३
५ ऑगस्ट १३
६ ऑगस्ट ११
७ ऑगस्ट १४
८ ऑगस्ट १०
९ ऑगस्ट १३
एकूण रुग्ण ११०४

रुग्ण दुपटीचा कालावधी -५२ दिवस

south mumbai area dongri masjid bunder corona virus cases increasing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com