विशेष कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर

विशेष कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर

उल्हासनगर : वाहनांवर पदाचा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन करतानाच दुरुपयोग करणारे ठाणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी जिल्हाधिकारी यांच्या रडारवर येणार आहेत. वणवा समता परिषदने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारींनी अशा वाहनांची आरटीओ विभागाच्या वतीने झाडाझडती घेणार असल्याचे आश्वासन दिले. ते पाहता लवकरच वाहनांवरील विशेष कार्यकारी हा उल्लेख नामशेष होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या वतीने महानगरपालिका, नगरपरिषदेत निवडून येणारे लोकप्रतिनिधी, विविध पक्षाच्या शिफारशीनुसार सक्रिय असणारे ठराविक मंडळी यांच्या पदसिध्द विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. हे पद कसे हाताळावे यासाठीच्या नियमाचे चार परिच्छेद विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी जारी केलेले आहेत. यात तिसऱ्या परिच्छेदातील नियमात या पदावर नेमणुका झालेल्या व्यक्तीने त्यांचे निवासस्थान, दुकान व कार्यालयावर विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा फलक लावावा.

तसेच कालावधी संपुष्टात येताच त्यांनी लागलीच फलक काढून टाकावेत. विशेषतः याच परिच्छेदात कुणीही त्यांच्या वाहनांवर विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा उल्लेख करू नये, असेही बजावण्यात आलेले आहे. मात्र, बरेच विशेष कार्यकारी अधिकारी त्यांच्या वाहनांवर या पदाचा ठळकपणे उल्लेख करून तिसऱ्या परिच्छेदातील नियमांचे सऱ्हासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत. आश्चर्य म्हणजे काळ्या काचांच्या वाहनांवर या पदाच्या उल्लेखासोबतच देशाचे बोधचिन्ह असलेले अशोकस्तंभही काही मंडळी वापरत आहेत.

अशोकस्तंभ वापरण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपती, राज्यपाल आणि आयएएस अधिकारी यांनाच असताना त्याचा वापर या व्यक्तींकडून केला जात आहे. ही बाब धक्कादायक आहे. ही वाहने पोलिसांच्या वतीने थांबवले जात नाही, त्यांची चौकशी केली जात नाही. त्यामुळे काही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा आशयाचे निवेदन वणवा समता परिषदचे प्रदेशाध्यक्ष निलेश पवार यांना ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना प्रत्यक्ष भेटीत दिले आहे.

या निवेदनाची दखल नार्वेकर यांनी घेतली आहे. ज्यांच्या विशेष अधिकारी पदावर नेमणूका करण्यात आल्या आहेत. त्यांची वाहने तपासण्याचे झाडाझडती घेण्याचे आदेश जिल्ह्यातील आरटीओ यांना देण्यात येणार असल्याचे आश्वासन राजेश नार्वेकर यांनी निलेश पवार यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com