स्कूल बसविरोधात विशेष तपास मोहीम ; 12 वाहने जप्त

स्कूल बसविरोधात विशेष तपास मोहीम ; 12 वाहने जप्त

वाशी : नवी मुंबईमध्ये अवैध स्कूल बसची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिवहन विभागाने विशेष तपास मोहीम राबवून अनेक वाहनांवर कारवाई केल्याने बेकायदा वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. 1 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत नियमांचे पालन न करणाऱ्या 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

ही विशेष मोहीम नवी मुंबईतल्या नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे व एमआयडीसी या भागांत 1 ऑक्‍टोबर 2018 ते 15 ऑक्‍टोबर या दरम्यान राबवण्यात आली. या वेळी स्कूल बस संदर्भातील सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. या विशेष तपास मोहिमेत 155 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतूक करणारी खासगी अवैध वाहने समजून 65 वाहनांची तपासणी करण्यात आली.

या संपूर्ण तपासणीमध्ये 15 दोषी स्कूल वाहने आढळून आली. त्यापैकी 12 स्कूल बस उप प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केल्या. आतापर्यंत या विशेष तपास मोहिमेत स्कूल बसकडून जवळजवळ सुमारे 46 हजार 500 रुपयांच्या रोख रकमेची वसुली करण्यात आली आहे. 

शाळेचे विद्यार्थी व शाळा यांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी; तसेच अवैध स्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी या विशेष तपास मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 15 दोषी वाहने समोर आली असून, त्यापैकी 12 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही मोहीम पुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. 

- दशरथ वाघुले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com