हो आम्हाला ठाऊक आहे, म्हणूनच लॉकडाऊनमुळे आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 एप्रिल 2020

कोरोनाच्या रुपाने आलेल्या संकटामुळे तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले असून ते दूर करून आजच्या तरुणाईमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने खास उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. 

पालघर : कोरोनाच्या रुपाने आलेल्या संकटामुळे तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले असून ते दूर करून आजच्या तरुणाईमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने खास उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. दांडेकर महाविद्यालय राबवत असलेल्या या उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद लाभत असून प्राध्यापक वर्ग आपल्या विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्यातील गोंधळाची स्थिती दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मोठी बातमी - वरळीनंतर मुंबईतील 'या' भागांमध्ये सापडतायत कोरोना रुग्ण, तुम्ही इथं राहात असाल तर पूर्ण काळजी घ्या...

अफवांमुळे गोंधळावस्थेत वाढ
समाज माध्यमांवर येणाऱ्या बातम्या, माहिती, व अफवा यांमुळे तरुण वर्ग सध्या प्रचंड गोंधळावस्थेत आहे. यामुळे नकारात्मकतेकडे वळू पाहणाऱ्या तरुण वर्गाला मानसिकदृष्ट्या खंबीरपणे कोरोनाशी दोन हात करता यावे, त्यांच्या मनात निर्माण होत असलेल्या संभ्रमाच्या व गोंधळलेल्या स्थितीत वैयक्तिक मार्गदर्शन मिळण्याचा प्रयत्न पालघर महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी करीत आहेत.

वैयक्तिक समुपदेशन करणार
दररोज मोकळेपणे  हिंडणे-बागडणे बंद झाल्याने तसेच वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावलेल्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे वेळापत्रक, पुढील प्रवेशप्रक्रिया व अशा विषयांचे प्रश्न रेंगाळत आहेत. ग्रामीण भागात योग्य माहिती शोधण्याच्या दृष्टीने मर्यादा येत असल्याने अशा विद्यार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशन करणे व त्यांना विविध ऑनलाइन उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवण्याचे महाविद्यालयांच्या नॅक समितीने योजिले आहे.

मोठी बातमी - "राज्यावर आता दुसरं संकट", फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणालेत शरद पवार...

युवावर्गासाठी विविध स्पर्धेंचे आयोजन
विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेविषयी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संशोधनाला चालना देणाऱ्या 'शोधयात्रा' स्पर्धा आयोजित करून त्याकरिता आवश्यक माहिती व शिक्षकांकडून मार्गदर्शन देण्यात आले. त्याचबरोबरीने सामाजिक विषयांवर विचार मांडणारी लघू चित्रफीत स्पर्धा आयोजित करण्यात आले असून अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट स्पर्धा, जाहिरात व पोस्टर बनवण्याची स्पर्धा महाविद्यालयाने आयोजित केली आहे.

special online counselling for youth during corona lockdown period read full report

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special online counselling for youth during corona lockdown period read full report