"जीएसटी'बाबत विशेष अधिवेशन

पीटीआय
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई - जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात बोलावण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात बोलावण्याची शक्‍यता आहे.

अर्थखात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात जीएसटी लागू करण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना दिल्या आहेत. येत्या मेअखेरपर्यंत कायदा अस्तित्वात येणे अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे. एक जुलैपासून देशात जीएसटी लागू करण्यासाठी चार कायदे मंजूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक राज्याने जीएसटी विधेयकाला मंजुरी देणे अपेक्षित आहे. यासंदर्भात देशातील सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची येत्या आठवड्यात दिल्लीत बैठक होणार असल्याचीही माहिती दिली. राज्य विधिमंडळात विधेयक मंजूर झाल्यानंतर सरकार करदर निश्‍चित करण्याचा मार्ग मोकळा होईल. अर्थात कराचा दर देशात समान असणार आहे. जूनमध्ये कराचे दर जाहीर होतील आणि त्यासंदर्भात अधिसूचना काढली जाणार आहे. त्यानंतरच एक जुलैपासून जीएसटी कायद्याची अंमलबजावणी होईल.

Web Title: special session for gst