नेरळ-माथेरान प्रवास काचेच्या डब्यातून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पर्यटकांची संख्या वाढणार 
मुंबईपासून जवळ असलेले  थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. त्यामुळे माथेरानला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकांमध्ये नेरळ ते माथेरान  धावणाऱ्या मिनी ट्रेनबद्दल मोठे कुतूहल असते. नेरळ ते माथेरान असे सात किलोमीटर इतके अंतर धावणाऱ्या  मिनी ट्रेनमधून पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येते. त्यामुळे या ट्रेनला पर्यटकांची मोठी पसंती मिळते. आता नव्याने दाखल होणाऱ्या विस्टाडोम बोगीमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून, महसूल वाढण्‍यासाठी मदत होणार असल्‍याचे  रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई -  माथेरानला जाण्यासाठी पर्यंटकांना नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास हे आकर्षण असते. आता या मिनी ट्रेनला विशेष विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना खऱ्या अर्थाने पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासोबत बैठक घेऊन नेरळ-माथेरान विस्टाडोमवर सकारात्मक चर्चा झाल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

विस्टाडोमचे नवे डबे जोडलेली मिनी ट्रेन येत्या २३ फेब्रुवारीपासून पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून लवकरच सेवेत दाखल होणार आहे. प्रवाशांना निसर्गाचा अास्वाद लुटता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष अशी विस्टाडोम बोगी तयार केली आहे. सध्या या बोगी डेक्कन क्वीन, मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी आणि पंचवटी या एक्‍स्प्रेस गाड्यांना जोडण्यात येणार आहेत. पारदर्शक काचा असलेल्या मोठ्या खिडक्‍या हे या कोचचे वैशिष्ट्ये आहे. या वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांना आजूबाजूचे निसर्गसौंदर्य न्याहाळता येणार असून नेरळ ते माथेरान या मिनी ट्रेनला जोडण्यात येणार आहे.

पर्यटकांची संख्या वाढणार 
मुंबईपासून जवळ असलेले  थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. त्यामुळे माथेरानला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकांमध्ये नेरळ ते माथेरान  धावणाऱ्या मिनी ट्रेनबद्दल मोठे कुतूहल असते. नेरळ ते माथेरान असे सात किलोमीटर इतके अंतर धावणाऱ्या  मिनी ट्रेनमधून पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येते. त्यामुळे या ट्रेनला पर्यटकांची मोठी पसंती मिळते. आता नव्याने दाखल होणाऱ्या विस्टाडोम बोगीमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून, महसूल वाढण्‍यासाठी मदत होणार असल्‍याचे  रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: special vestadome coach from neral to matheran mini train