तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक ट्रेन | कोकण - पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना फायदा

कुलदीप घायवट
Wednesday, 6 January 2021

कोकण रेल्वे मार्गावरून तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 06083 तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक विशेष ट्रेन पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी धावणार आहे.

मुंबई  :  कोकण रेल्वे मार्गावरून तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 06083 तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक विशेष ट्रेन पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी धावणार आहे. 9 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम्‌वरून मध्यरात्री 12.30 वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री 11. 40 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहचेल. 

गाडी क्रमांक 06084  हजरत निजामुद्दीन  ते  तिरुअनंतपुरम्‌ साप्ताहिक विशेष ट्रेन पुढील सूचना मिळेपर्यंत दर  सोमवारी धावणार आहे. 11 जानेवारी रोजी हजरत निजामुद्दीनहून पहाटे 5 वाजता ट्रेन सुटेल. ही ट्रेन तिसऱ्या दिवशी पहाटे 4.55 वाजता तिरुअनंतपुरम्‌ला पोहचेल. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

या गाडीला कोल्लम जंक्शन, कन्याकुलम,  कोत्याम, एर्नाकुलम, तृश्शूर, शोरानुर, कोझिकोडे, कन्नूर, मंगरुरू जंक्शन, उडुपी, कारवार, मडगाव जंक्शन, करमळी, रत्नागिरी, पनवेल, वसई रोड, डहाणू रोड, वापी, सूरत, भरुच जंक्शन, वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन, कोटा जंक्शन, सवाईमाधोपूर जंक्शन, भरतपूर जंक्शन आणि मथुरा जंक्शन या स्थानकात थांबा देण्यात आला आहे. 
कोरोनापासून बचाव होण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात यावे. प्रत्येक प्रवाशांने सामायिक अंतर राखावे. मास्क आणि सॅनिटायझेरचा वापर प्रवासात करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Special weekly train from Thiruvananthapuram to Hazrat Nizamuddin Benefits to Konkan - Western Railway passengers

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special weekly train from Thiruvananthapuram to Hazrat Nizamuddin Benefits to Konkan - Western Railway passengers