उल्हासनगरात क्रिकेटच्या सट्टेबाज महिलांचा पर्दाफाश

दिनेश गोगी
सोमवार, 7 मे 2018

उल्हासनगर : एकेकाळी क्रिकेट सट्टेबाजीचे माहेरघर असलेल्या व धाडसत्र सुरू झाल्यावर सट्टेबाजीचा गाशा गुंडाळणाऱ्या उल्हासनगरात पुन्हा सट्टेबाजीने डोके वर काढले आहे.विशेष म्हणजे आता या सट्टेबाजीच्या धंद्यात महिलांच्या समावेशाचा पर्दाफाश झाला आहे. कालरात्री इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल व किंग इलेव्हन पंजाब या मॅचवर सट्टा खेळताना 3 महिलांसह 6 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

स्टेशन रोडवरील रामदेव अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 501 मध्ये राजस्थान रॉयल व पंजाब इलेव्हन या संघात सुरू असलेल्या 20/20 ओव्हरच्या क्रिकेट मॅचवर सट्टा खेळण्यात असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अविनाश काळदाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे, उपनिरीक्षक योगेश गायकर, दीपक भोई,पोलीस नाईक अनिल ठाकूर आदींनी रामदेव अपार्टमेंट मधील फ्लॅट 501 मध्ये छापा मारला.क्रिकेटचा सट्टा खेळणाऱ्या सोनू शौकीन,विरु सत्या,सुनील धनराजानी यांच्या सोबत शितल मोटवानी,कंचन दुसेजा,पूजा आहुजा यांच्या मुसक्या आवळल्या.त्यांच्याकडून टिव्ही मोबाईल असा 60 हजार रुपयांच्या आसपासचा ऐवज जप्त  करण्यात आला आहे.मुंबई जुगार एक्ट अंतर्गत सहा जणांना अटक करण्यात आल्यावर त्यांना वैयक्तिक जामिनावर सोडण्यात आले आहे.

2001 मध्ये अमर जाधव हे गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस आयुक्त असताना त्यांनी उल्हासनगरात छापा मारून क्रिकेट सट्टेबाजी चव्हाट्यावर आणली होती.यात राष्ट्रवादी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांचे नाव सट्टेबाजांचा म्होरक्या म्हणून धक्कादायक रित्या पुढे आल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. याप्रकरणात चार महिने वॉन्टेड राहिलेल्या अनिल जयसिंघानी यांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता.याप्रकाराने धास्तावलेल्या सट्टेबाजांनी शहरातून गाशा गुंडाळला होता.ते हायवे वरील किंबहूना लांबच्या शहरातील हायफाय हॉटेलातून सट्टेबाजीची यंत्रणा हाताळत होते. मात्र कालरात्री 3 महिलांसह 6 जणांच्या मुसक्या आवळल्याने शहरात पुन्हा सट्टेबाजीने डोके वर काढले काय?असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: speculation by women in ulhasnagar arrested