पाऊस ठरवणार बुलेट ट्रेनचा वेग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - देशातील सर्वांत वेगवान प्रवासाचा पर्याय असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा वेग पाऊस ठरवणार आहे. चाळीस मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास या ट्रेनचा वेग कमी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबई- अहमदाबाद या 508 किलोमीटर लांबीच्या मार्गावर बुलेट ट्रेन ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणार आहे. या ट्रेनचा आराखडा तयार असून, भारतीय हवामानानुसार तिची रचना असणार आहे. मात्र, "राष्ट्रीय जलद रेल निगम लिमिटेड'च्या सर्वेक्षणानुसार बुलेट ट्रेनच्या वेगात पाऊस अडथळा ठरू शकतो, असे निदर्शनास आले आहे. ताशी 50 मिलिमीटर किंवा 24 तासांत 400 मिलिमीटर पाऊस सतत पडल्यास त्याचा परिणाम बुलेट ट्रेनच्या फेऱ्यांवर होण्याची शक्‍यता आहे. 40 मिमी किंवा 180 मिमी पाऊस पडल्यास बुलेट ट्रेनचा वेग कमी करून ताशी 160 किमी करण्यात येईल. तसेच, 45 मिमी किंवा 220 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद 24 तासांत झाल्यास बुलेट ट्रेनचा वेग थेट ताशी 70 किमीवर आणण्यात येणार आहे.

Web Title: The speed of the bullet train to show the rain