राज्यभरात आजपासून दहावीची परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - बारावीचे पेपर सतत व्हॉट्‌सऍपवर फुटत असून, या पेपरफुटीच्या वातावरणातच मंगळवारपासून (ता. 7) दहावीच्या परीक्षेला सुरुवात होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांत 7 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान घेण्यात येईल. 

परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 250 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळांत विशेष भरारी पथके आहेत. 

या परीक्षेला राज्यभरात 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी बसले आहेत. त्यात नऊ लाख 89 हजार 908 विद्यार्थी आणि सात लाख 76 हजार 190 विद्यार्थिनी आहेत. 21 हजार 686 माध्यमिक शाळांतील विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. संपूर्ण राज्यात चार हजार 728 परीक्षा केंद्रे आहेत. यातील 17 लाख 52 हजार 270 नियमित आणि 63 हजार 412 पुनर्परीक्षार्थी आहेत. 

अपंगांना विशेष सवलत 
तब्बल सात हजार 414 अपंग विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना सोईचे परीक्षा केंद्र, वेळेची सवलत, मागणीनुसार लेखनिक, विषय, योजना इत्यादी सवलती मिळतील. 

आऊट ऑफ टर्न परीक्षा 
वैद्यकीयदृष्ट्या किंवा अपरिहार्य कारणास्तव प्रात्यक्षिक परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची आऊट ऑफ टर्न ही परीक्षा 3 ते 5 एप्रिल दरम्यान होईल. 

Web Title: ssc exam start today