सुशांत सिंह ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी मोठी बातमी, शौविक-सॅम्युअलची रवानगी NCB कोठडीत

पूजा विचारे
Saturday, 5 September 2020

सुशांत सिंह ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांनाही किला कोर्टाकडून ४ दिवसांची कोठडी सुनावली आली.

मुंबईः  सुशांत सिंह ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांनाही किला कोर्टाकडून ४ दिवसांची कोठडी सुनावली आली. शौविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यत कोठडीत राहावं लागणार आहे. 

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना काल अंमली पदार्थविरोधी पथकानं (एनसीबी) अटक केली. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयानं ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. सुशांत सिंह प्रकणात ड्रग्जचे धागेदोरे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने मोठी कारवाई करत या दोघांना अटक केली.

एनसीबीने अटकेची कारवाई केली. त्यातून मुंबई पोलिस मोठं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असून ही कुटुंबियांना वाटणारी भीती बरोबर होती, हे सिद्ध झालंय. या प्रकरणात वेगवेगळे अँगल आहेत. वेगवेगळया अंगाने तपास होऊन, आणखी माहिती समोर येईल अशी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांना अपेक्षा आहे, असं सुशांतच्या कुटुंबीयांचे वकिल विकास सिंह म्हणाले.

 

न्यायालयात आणण्याआधी दोघांची सायन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. शौविकनंतर एनसीबी रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे. या दोघांनी सुशांतला अंमली पदार्थाच्या नशेची सवय लावून अंमली पदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागल्याचं समजतंय. 

 

आता भावाच्या अटकेनंतर रियाच्या अडचणीही वाढणार असून एनसीबी रियालाही लवकरच समन्स बजावण्याची शक्यता आहे.
 

SSR Case Showik Chakraborty Samuel Miranda NCB custody 9th September


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSR Case Showik Chakraborty Samuel Miranda NCB custody 9th September