‘रोल्टा’ची एसटीकडे दीड कोटीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मुंबई - एसटी महामंडळाचे ८८ कोटींचे बेकायदा कंत्राट वादात अडकल्यानंतर एसटी महामंडळाने रोल्टा इंडिया कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, त्यानंतर रोल्टा कंपनीने एसटी महामंडळाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे. त्यात कंत्राट रद्द करत असल्यास एक कोटी ४० लाख रुपये द्यावेत, असे रोल्टाने म्हटले आहे. बॅंकेतील चार कोटींच्या अनामत रकमेचीही मागणी कंपनीने केल्याने एसटी अधिकारी गोंधळले आहेत. 

एसटी महामंडळाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विविध विभागांच्या संगणकीकरणासाठी (ईआरपी) रोल्टा कंपनीला ८८ कोटींचे कंत्राट बेकायदा मंजूर केले होते. ‘सकाळ’ने हा प्रकार उघड केला. कंपनीला कंत्राट देण्यापूर्वी प्रकल्प अहवाल काढणे अनिवार्य आहे. महामंडळाचा फायदा-तोटाही तपासणे अपेक्षित असते; मात्र नियम डावलून एसटीने ‘रोल्टा’ कंपनीला कंत्राट दिले होते. ‘सकाळ’च्या वृत्तानंतर एसटीने ‘रोल्टा’ कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.

करार नसताना कार्यादेश
या कंत्राटाबाबत आणखी बाब उघडकीस आली आहे. एसटीने ‘रोल्टा इंडिया कंपनी’सोबत कंत्राटाचा कोणताही करार केलेला नसून, कार्यादेशच दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: ST 1.5 Crore Demand by Rolta