
या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाला सरकारनं १० लाखांची मदत जाहीर केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. अनिल परब यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.
मुंबईः मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पनवेलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पनवेलपासून 9 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे एसटी बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सातारा (कलेढोन) येथून मुंबई (परळ) येथे जात असलेल्या एसटी बस (क्रमांक एमएच १४- बीटी ४६९७) याला अनोळखी कंटेनरने उजव्या बाजूने मागून धडक दिली. या अपघातात चालकासह १५ जण जखमी झाले.
या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाला सरकारनं १० लाखांची मदत जाहीर केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. अनिल परब यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.
अनिल परब यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वडूज - मुंबई एसटी बसला पनवेल जवळ अपघात झाला.यात १५ जण जखमी झाले आहेत व दुर्दैवाने एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.सर्व जखमींवर उपचार सुरू असून मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वडूज - मुंबई एसटी बसला पनवेल जवळ अपघात झाला.यात १५ जण जखमी झाले आहेत व दुर्दैवाने एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.सर्व जखमींवर उपचार सुरू असून मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. pic.twitter.com/EvVYo24PAq
— Anil Parab (@advanilparab) November 26, 2020
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बसला अज्ञात वाहनाची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की एसटी बसचा उजव्या बाजूकडील पत्रा कापत जबर धडक बसली होती. उजव्या बाजूकडील आसनावर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी गंभीर जखमी आहेत.
महामार्ग पोलिस देवदूत यंत्रणा लोकमान्य रुग्णालय रुग्णवाहिका यांनी वेळीच मदत कार्य करत तातडीने सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. प्रवाशांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महामार्ग वाहतूक पोलिस संबंधित कंटेनरचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
ST accident Mumbai Pune Expressway 10 lakh aid dead passenger Transport Minister announces