एसटीमध्येही वाय-फाय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

मुंबई - रेल्वेपाठोपाठ आता एसटीमध्ये "वाय-फाय‘ तंत्रज्ञानाचे युग अवतरले आहे. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील 50 बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाय-फाय यंत्रणा बसवण्यात आली आहे. लवकरच राज्यातील सर्व एसटी बसमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. 

शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन बसमध्ये ही सेवा देण्यात आली आहे. त्यासाठी एसटीने "यंत्र मीडिया‘ या कंपनीची निवड केली आहे. या सेवेचा वापर करण्याआधी प्रवाशांना स्मार्टफोनमधील वाय-फाय सुरू करावे लागेल. त्यानंतर इंटरनेट ब्राउझर ऍप सुरू करून यंत्र मीडियाची यूआरएल लिंक ओपन करावी लागेल. प्रवाशाने प्राथमिक माहिती भरल्यानंतर त्याला वाय-फाय सेवेचा लाभ घेता येईल, असे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

रेल्वेत वाय-फाय 

पश्‍चिम रेल्वेच्या सहा स्थानकांवर 22 ऑगस्टला वाय-फाय सेवा सुरू होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या सेवेचे उद्‌घाटन होईल. चर्चगेट, महालक्ष्मी, दादर, वांद्रे टर्मिनस आदी स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वसई रोड व नालासोपारा स्थानकांतील पायाभूत सुविधांचे उद्‌घाटन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: ST also held in Wi-Fi