
ST Bus : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम रद्द; कारण...
मुंबई : ओरिसा राज्यात घडलेली रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत २३३ मृत्यू तर १००० पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले आहे. मृत पावलेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रध्दांजली वाहिली असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी आज, शनिवारी एसटी महामंडळाचे अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमीत्त्य आयोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
एसटीचे असे होते पंचकलमी कार्यक्रम
- २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सुरक्षित सेवा बजावणा-या पाच चालकांचा सपत्निक सत्कार
- करोनानंतर दर्जेदार कामगिरी करणाऱ्या राज्यातील तीन विभांगाचा व ९ आगारांचा सत्कार.
- दुररर्शी प्रणालीव्दारे राज्यातील बसस्थानकांचे भुमिपुजन, उद्घाटन आणि बसस्थानक परिसराचे कॉक्रिटिकरण.
- एसटी कॉफीटेबल पुस्तकाचे अनावरण
- एसटी विश्वरथाचे उद्घाटन