मोखाडा : केळं दाखवून एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा निषेध  | Anil Parab | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus Corporation Strike

मोखाडा : केळं दाखवून एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा निषेध 

मोखाडा : एसटीचे (ST Bus corporation) राज्य शासनात (mva government) विलीनीकरणासाठी (merge demand) एसटी आगार जव्हार मधील (ST Depot jawhar) सर्व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा (ST Workers strike) आजचा १७ वा दिवस होता. कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर मात्र ठाम आहेत.

हेही वाचा: वेतनवाढीनंतरही राज्यभरातील कर्मचारी संपावर ठाम

काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली की एसटीचे विलीनीकरण शक्य नाही. त्यामुळे अंतरिम वेतनवाढ दिली, मात्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली वेतनवाढ ही फसवी आहे, त्यामुळे जव्हार आगारातील कर्मचाऱ्यांनी केळी दाखवून निषेध व्यक्त केला आहे. 

राज्य शासनाने केलेली वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मान्य नाही. राज्य सरकार जरी ऐतिहासिक वेतनवाढ केली म्हणून पाठ थोपटून घेत असले, तरी कर्मचाऱ्यांना ती मान्य नाही. अंधकारमय वेतनवाढ दिल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे जव्हार आगाराच्या  संतप्त कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला केळी दाखवून निषेध व्यक्त केला. जव्हार आगारातील एकही बस  8 नोव्हेंबर पासून निघालेली नसून, आंदोलनाचा हा  17 वा दिवस आहे.

loading image
go to top