डबल डेकर एसटीची बेल अधांतरीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई - प्रवासी क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने एसटीची डबल डेकर बस रस्त्यावर आणण्याचा विचार सुरू असला, तरी अनेक तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. त्यामुळे ही बस प्रत्यक्षात धावेल का? याबाबत महामंडळातील अधिकारीच साशंक आहेत. 

एसटीच्या ताफ्यात 18 हजार बस आहेत. महामंडळाने नुकत्याच स्वत:च्या मालकीच्या 70 वातानुकूलित बस विकत घेतल्या; मात्र आणखी हजाराहून अधिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून नव्या बसचे धोरण ठेवण्यात आले आहे. गर्दी असो किंवा नसो, एसटीला एकाच मार्गावर अनेक बस सोडाव्या लागतात. त्यामुळे एसटीची डबल डेकर बस चालवता येईल का? याबाबत सात वर्षांपूर्वी महामंडळाने विचार केला होता; मात्र त्याला अंतिम स्वरूप आलेच नाही. महामंडळाने व्होल्वो आणि स्कॅनिया कंपन्यांशीही बोलणी सुरू केली. त्यांच्याकडूनही काही मुद्दे उपस्थित झाले. एसटीच्या एका विभागाने तांत्रिक मुद्दा उपस्थित केला आहे. डबल डेकर बस चालवायची झाल्यास घाटरस्त्यात बरेच अडथळे येतील, ही बस घाटातून चालवताना रस्त्याच्या मधोमध चालवावी लागेल, जेणेकरून वळणावर अपघात होऊ नये, असा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे आता एसटीच्या प्रमुखांकडून डबल डेकर बसबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: ST Double Decker Bell

टॅग्स