एसटीचा प्रवास आणखी आरामदायक

st buses
st buses

मुंबई : एसटीचा लांब पल्ल्याचा, तसेच रात्रीचा प्रवास आता अधिक आरामदायी होणार आहे. एसटीच्या ताफ्यात विना-वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या 20 बस दाखल झाल्या आहेत. या बसमध्ये 30 आसनी आणि 15 शयनयान असे एकूण 45 आसने असतील. एमजी ऑटोमोटिव्हस या कंपनीने या बसची बांधणी केली असून या प्रकारच्या एकूण 200 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. 

दिवाकर रावते यांनी 2018 मध्ये वातानुकूलित शिवशाहीसोबत विना-वातानुकूलित आसनी आणि शयनयान अशी एकत्रित सोय असलेल्या बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार या प्रकारच्या 200 बसची बांधणी केली जात असून त्यापैकी 20 बस कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. या बस मुख्यतः रात्रकालीन लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालवण्यात येणार आहेत. या नवीन बस सेवेचे तिकीट दर निमआराम बसप्रमाणे असणार आहे. महामंडळाच्या स्व-मालकीच्या या बसेसमध्ये आरामदायी आसनांसह सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही, स्वतंत्र छोट्या आकाराचे फॅन आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. 
------------ 
या मार्गावर धावणार बस 
सुरुवातीला या बस पारगड (कोल्हापूर)- परळ, पाटगाव (कोल्हापूर)- परळ, बुलढाणा- मुंबई सेंट्रल, सांगली- मुंबई सेंट्रल, अंमळनेर (जळगाव)- मुंबई सेंट्रल या मार्गावरील रातराणीच्या जागी धावण्याची शक्‍यता असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com