एसटी संघटनांना वेतनवाढीची घाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - संप करून व्यवस्थापनाला कोंडीत पकडणाऱ्या एसटी कामगार संघटनांना आता वेतनवाढ मिळवण्याची घाई झाली आहे. तडजोडीनुसार मान्य केलेली वेतनवाढ लवकरात लवकर मंजूर करा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने व्यवस्थापनाकडे केली आहे.

याआधी जाहीर केलेली वेतनवाढ अपुरी असल्याची तक्रार करत एसटी कामगार संघटनांनी अघोषित संप पुकारला होता. त्यानंतर व्यवस्थापनाशी तडजोड करून संप मिटवण्यात आला.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. ही वाढ कर्मचाऱ्यांना मंजूर नव्हती. त्यामुळे सोशल मीडियावर संपाची हाक देत संप पुकारण्यात आला. यात एसटीला तब्बल 33 कोटी रुपयांचा फटका बसला. संप मिटवण्यासाठी परिवहनमंत्री रावते यांनी कामगार संघटनांना चर्चेसाठी बोलावले. या बैठकीत तडजोड मान्य करत कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला.

त्यानुसार 2016 ते 2020 या कालावधीच्या वेतनवाढीसाठी चार हजार 849 कोटींचे वाटप मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या सूत्राप्रमाणे करण्याचे ठरले आहे. ही वेतनवाढ लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी मान्यताप्राप्त संघटनेने व्यवस्थापनाकडे केली आहे.

Web Title: ST Organisation salary