वेतनकपातीविरुद्ध एसटी संघटना कोर्टात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

मुंबई - एसटी संपकाळात कामावर गैरहजर राहिलेल्या कामगारांचे वेतन महामंडळाने कापले आहे. याविरोधात मान्यताप्राप्त कामगार संघटनेने मंगळवारी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. यामुळे पुन्हा व्यवस्थापन विरुद्ध कामगार संघटना, असा संघर्ष उभा राहिला आहे.

महामंडळाने घोषित केलेली वेतनवाढ अपुरी असल्याचे सांगत एसटी कामगार 8 व 9 जून रोजी अघोषित संपावर गेले होते. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मध्यस्थीने कामगार संघटनांनी 9 जून रोजी संप मागे घेतला होता. संपात सहभागी झालेल्यांचे संबंधित काळाचे वेतन जुलै व ऑगस्टच्या वेतनातून कापले जाणार आहे. त्यानुसार जुलैच्या वेतनातून कपात करण्यात आली आहे. या विरोधातील दाव्याची सुनावणी 20 जुलैला होणार आहे.

Web Title: st organisation salary shortage court