एसटीच्या "रातराणी'त आता "स्लीपर बर्थ'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

मुंबई - एसटी महामंडळ आता 30 आसने आणि 15 "स्लीपर बर्थ' असलेल्या दोनशे रातराणी बसची बांधणी करणार आहे. महामंडळाने या संदर्भातील निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरवात केली असून, एप्रिल महिन्यापर्यंत या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

आतापर्यंत एसटीच्या काही "शिवशाही' बसमध्ये "स्लीपर बर्थ' होते. आता रातराणी बसमध्येही प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. परिवहन खात्याच्या नियमानुसार ही सुविधा असलेल्या बस वातानुकूलित असणे अनिवार्य आहे; मात्र आपल्या बिगरवातानुकूलित बसमध्ये "स्लीपर बर्थ' ठेवण्याची परवानगी महामंडळाने घेतली आहे. महामंडळाने 1,300 बसची बांधणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी 700 गाड्यांसाठी राज्य सरकार अनुदान देणार आहे.

Web Title: St Ratrani Bus Sleeper Birth