एसटीतील भरतीला न्यायालयात आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) २०१५-१६ मध्ये झालेल्या वाहनचालकांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी घेण्यात आलेली ८,०२२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया अडचणीत आली आहे.

मुंबई - राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) २०१५-१६ मध्ये झालेल्या वाहनचालकांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी घेण्यात आलेली ८,०२२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया अडचणीत आली आहे. या भरतीविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेतून विविध जिल्ह्यांतील रिक्त पदे महामंडळाला भरायची होती; मात्र त्यापैकी निवड झालेल्या काही उमेदवारांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नसल्याने या उमेदवारांनी एसटीच्या नव्या भरती प्रक्रियेविरोधात याचिका केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान औरंगाबाद खंडपीठाने जुन्या भरतीतील चालक पदांच्या उमेदवारांसाठी, नव्या भरतीतील जागा राखून ठेवण्याचा तात्पुरता आदेश दिला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

Web Title: ST Recruitment Court