ठाण्यात आता एसटी आरक्षणही कॅशलेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

ठाणे - एसटी महामंडळाने डिजिटलायझेशनसाठी पुढाकार घेत आगारात कॅशलेस आरक्षण सेवा सुरू केली आहे. आरक्षण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आता थेट कॅशऐवजी स्वाईप मशीन्सद्वारे कार्डनेही पैसे देणे शक्‍य होणार आहे. नोटाबंदीच्या काळात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील पाच आगारांत ही सेवा सुरू करण्याचे महामंडळाने ठरवले होते. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

ठाणे एसटी महामंडळाचे वंदना आगार, खोपट आगार, ठाणे रेल्वे स्थानक आगार, सुकुरवाडी (बोरिवली) आणि ज्ञानशी (बोरिवली) हे पाच आगार असून या पाचही ठिकाणी कॅशलेस व्यवहारांसाठी आवश्‍यक मशीन देण्यात आले आहेत. डिजिटल इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल टाकल्याचे ठाणे एसटी महामंडळाने स्पष्ट केले. या उपक्रमाला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेनेही ऑनलाईन आरक्षण, मोबाईल ॲपद्वारे एसटी महामंडळाची पुरेपूर माहिती आणि आरक्षण करण्याची सेवा देऊ केली आहे.

महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने व्यवहार होत असल्याने सुट्या पैशांची चणचण भासते. कॅशलेस व्यवहारामुळे नागरिकांना अत्यंत कमी वेळात आरक्षण करता येईल. सुट्या पैशांचा प्रश्‍न मिटेल. राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा प्रयत्न होत आहे. प्रत्येक विभागातील आगारांमधील आरक्षण खिडक्‍यांसाठी स्वाईप मशीन देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार असला, तरी ठाणे विभागाने यात आघाडी घेतली आहे.
- सुभाष चौगुले, एसटी विभाग वाहतूक अधीक्षक

Web Title: ST reservation station now cashless